💻 *Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती*💻
*संवर्ग ४ साठी..* ...
✅HM login वरुन *Transfer Portal login* करा..
✅, यानंतर *Intra-District Transfer* या टॅबला क्लिक करा
✅त्यातील २ री *TUC Application* या टॅबला क्लिक करा..
✅ *Select Designation*मध्ये Headmaster/ Under graduate teacher/Graduate teacher यापैकी जे असेल ते क्लिक करा..
✅ *Select teacher* मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..येथे आपणास आपल्या शाळेतील १० + सर्व शिक्षक(TUC) यांची नावे दिसतील पैकी आपले नाव निवडा
✅संबंधित शिक्षकाची *staff portal* ला *verify* केलेली माहिती दिसून येईल..
ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, अशांना आपली माहिती cluster ला verification करा अशी सुचना येते अशा शिक्षक बांधवा यांनी hm login ला माहिती भरून cluster ला सदर पेज personal details पेज verification केली की लगेच आपणास form भरता येईल
✅ *Select Category* मध्ये administrative व request यापैकी योग्य पर्याय वर क्लिक करा..( सकाळच्या संवर्ग ४ च्या मार्गदर्शन post अभ्यासा ही विनंती )
✅यानंतर जि.प.to जि.प.शिक्षक यांना पती/ पत्नी लाभ घ्यायचा यापैकी YES/ No पर्याय निवडा आपल्या ला हवा असलेला ...
✅पती / पत्नी YeS पर्याय निवडल्यास जोडीदाराचा staff id व तत्मस माहिती भरा
✅ *Select subject* मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..
✅आपणास *कमीत कमी 1* व *जास्तीतजास्त 20* पसंतीक्रम भरता येतील..
✅पसंतीक्रम भरताना *जिल्हा* निवडा किंवा आपोआप दिसेल..
✅त्यानंतर *तालुका* निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल..त्यातील हवा तो तालुका निवडा..
✅*Select village* मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..
✅*Select school* मध्ये निवडलेल्या महसूली गावातील जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा..
✅अशाप्रकारे 20 शाळा निवडून *add* करत राहा..
✅भरलेल्या पसंतीक्रमामध्ये *Save* करण्याच्या आधी बदल करता येतील..
🎉पसंतीक्रम *delete* करता येईल.. *update*देखील करता येईल..पसंतीक्रम *खाली-वर* करता येईल..( rearrange)
*आवश्यक* तसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..
✅अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी ट *Veiw option(draft version)* या tab वर क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..
🎯माहिती तपासून ती बरोबर असल्यास *Verification of transfer application*या tab वर क्लिक करा..
🎯माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास *verify* करा..
🎯Verify केल्यानंतर विवरणपत्रात *कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही..*त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते *verify करण्यापूर्वीच करावेत..*
🎯Verify केल्यानंतर शेवटची टॅब *Print transfer application* मधून प्रिंट काढण्यापूर्वी self certified या watermark सोबत *मा.अवर सचिव कांबळे साहेब* यांची स्वाक्षरी दिसेल..
अशी स्वाक्षरी दिसणा-या form चीच print काढावी..
🎯 *important* 🎯
*Online form हे HM login वरुन भरता येणार आहेत..*
*चुकीची माहिती भरुन बदली प्रक्रियेत फायदा घेतल्यास संबंधित शिक्षकाबरोबरच HM login वरुन form भरावयाचा असल्याने मुख्याध्यापकासही जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे..त्यामुळे बदली प्रक्रियेत आपले सहकारी चुकीची व खोटी माहिती भरणार नाहीत याची मुख्याध्यापकांनी काळजी घ्यावी..*
*Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत पुराव्यासह शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी..1 प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी..*
*बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते..*
🎯*अधिक माहितीसाठी शासन निर्णय दि. 27.02.2017,शासन निर्णय व ग्रामविकास विभागाकडून वेळोवेळी येणारी पत्रे व मा.प्रदीप भोसले सर,सरल राज्य समन्वयक,NIC पुणे यांचेकडून वेळोवेळी येणा-या सरल सूचनांचे व manual चे अवलोकन करावे..*
*आजपासुन खर्या अर्थाने संवर्ग ४ बांधव form भरत आहे असे लक्षात आले म्हणून* ....
*फक्त माहितीस्तव ही post*
No comments:
Post a Comment