करा आधार कार्ड मध्ये मो न अपडेट
आधारकार्ड मध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करणे.
आपल्याला शासनाच्या digital locker किंवा अन्य काही सुविधा घ्यायच्या असतील तर आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डवर लिंक असला पाहिजे.
काही वेळा आपला मोबाईल क्रमांक आधारकार्ड ला लिंक नसतो किंवा पाहिल्यावेळेस जर कोणता तरी मोबाईल क्रमांक लिंक केला असेल तर तो सीम बंद असतो किंवा हरवलेला असतो.
आपल्याला जर पहिल्यांदा मोबाईल क्रमांक register करायचा असेल किंवा जो सीम बंद आहे ज्याच्यावर otp येत नाही तर कोणत्याही प्रकारे आतातरी online बदलता येत नाही.
त्यासाठी आपल्याला आधारकेंद्रावर जाऊन त्यात बदल करता येतो ते आपले प्रोपर वेरीफिकेषण करतात.
आधारकार्ड वर लिंक केलेला मोबाईल क्रमांक सुरु असेल तर आपल्याला कोणताही नवीन क्रमांक online बदलता येतो.
त्यासाठी खालील साईट वर जा.
https://ssup.uidai.gov.in/ssup-home
या साईट वर गेल्यानंतर To submit your update/ correction request online please CLICK HERE अशी सूचना सर्वात खाली असेल आपण click here वर क्लिक करा.
आता आपल्या समोर आधार सेल्फ सर्विस पोर्टल ओपन होईल.
त्यातील पहिला पर्याय Login with aadhaar मध्ये Enter Your Aadhaar number मध्ये आधारक्रमांक टाका Text Verification मध्ये दिलेला वरचा कोड टाका सेंड otp वर click करा आपल्या register मोबाईल क्रमांकावर वर तो otp जाईल . Enter OTP Received मध्ये आपल्याला आलेला otp नंबर टाकावा व लॉगीन वर click करावे.
आता Data Update request ही विंडो ओपन होईल त्यात आपल्याला कोणकोणत्या बाबींमध्ये आधारकार्ड मध्ये बदल करायचा आहे त्या दिसतील आपण Mobile च्या समोर चेकमार्क करा व submit वर क्लिक करा.
आपल्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यात आपण आपला जो नवीन मोबाईल नंबर register करणार आहोत तो टाकायचा submit update request वर click करायचे, या नंतर लगेचच आपल्या समोर एक दुसरी विंडो येईल त्यात confirm करण्यासाठी चेकमार्क करा व proceed वर click करा.
जसे आपण proceed वर click करू त्याबरोबर एक रिक्वेस्ट number स्क्रीन वर येईल तो प्रिंट काढा किंवा डाऊनलोड करा.
आपला मोबाईल क्रमांक हा update झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी वर तिसर्या क्रमांकाचा पर्याय update status वर click करायचे, त्यावर आपण आपला आधारकार्ड क्रमांक व update request number टाकून get status वर क्लिक करायचे. आपल्या आधारकार्ड वर हा नवीन क्रमांक update झाला आहे का नाही याची माहिती मिळेल.
अशा प्रकारे आपण आपल्या आधारकार्ड ला नवीन क्रमांक update करू शकतो.
No comments:
Post a Comment